दादा पाटील महाविद्यालयास पुरस्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयात कौशल्य पूरक उपक्रम राबवले जात आहे . विद्यार्थी डिग्री घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडताना कोणते ना कोणते कौशल्य घेऊनच बाहेर पडणार आहे.याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रांतर्गत करीयर कट्टा उपक्रमांचे दादा पाटील महाविद्यालयाने उत्कृष्ट नियोजन आणि संयोजन केले आहे.त्याबद्दल महाविद्यालयास पुरस्कार मिळाला . महाविद्यालयातील रसायनशास्र विभागातील प्रा. संतोष रामचंद्र क्षीरसागर यांना उत्कृष्ठ तालुका समन्वयक म्हणून सन्मानित करण्यात आले . हा सन्मान सोहळा मा.यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता कक्ष, मा.नंदकुमार निकम अध्यक्ष, प्राचार्य फोरम, गजानन एकबोटे अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य घोरपडे साहेब , प्राचार्य प्रवर्तक डी .डी पाटील, प्राचार्य गजानन खरात व पुणे, नगर, नाशिक विभागातील प्राचार्य आणि समन्वयक उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या, जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा.आमदार रोहित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा.राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.बप्पासाहेब धांडे, महाविद्यालयातील सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल अभिनंदन केले .