सार्वजनिक शिवजयंती कर्जत तालुक्यातील शिंदे येथे मोठ्या उत्साहात संपन्न

कर्जत प्रतिनिधी:- कर्जत तालुक्यातील शिंदे येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत गावातून मिरवणूक काढण्यात आली. उपस्थितांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते.
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांच्या वेशात घोड्यावर बसून अनेकजण सहभागी झाले. महिला, मुली व ग्रामस्थ फेटे बांधून सहभागी झाले. मिरवणुकीत डीजेसह लेझीम व हलगी पथके सहभागी झाली. मुलींनी दांडपट्टा, तलवार बाजी असे मर्दानी खेळ सादर केले.
उपसभापती राजेंद्र गुंड, अशोक खेडकर, बळीराम यादव, सचिन पोटरे, नितीन धांडे, पप्पूशेठ धोदाड, विजय तोरडमल, वैभव लाळगे, भाऊसाहेब रानमाळ, सुनील साळुंके, राहुल नवले, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार मान्यवरांच्या उपस्थित शिवध्वजाचे पूजन करण्यात आले.
यावेळी मानवंदना देऊन महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमात चौकाचे नामकरण करण्यात आले. प्रास्ताविक संभाजी घालमे यांनी केले. सरपंच मधुकर घालमे यांनी चौकाचे छत्रपती शिवाजीराजे चौक असे नामकरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन बाळासाहेब घालमे व संभाजी घालमे यांनी केले.
रात्री साडेआठनंतर सीमाताई पाटील व जॉली मोरे यांचा संगीतमय कार्यक्रम झाला. मधुकर घालमे यांनी उपस्थितांचे आभार मानले.