दादा पाटील महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालायात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ दि. २१ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होतो आहे.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये सकाळी १० वाजता ‘चित्रकला’ स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राशीन येथील कलाशिक्षक मजहर सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय कांबळे प्रा. अजित पाटील, प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन प्रा. कर्ता वसावे, प्रा. राम काळे, प्रा. मीना खेतमाळीस यांनी केले.
‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जयंती दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ यांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी व समन्वयकांनी केलेले आहे