मा. मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धा : महेश तनपुरे

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांच्यां पावन भुमित कर्जत-जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार व माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पै. प्रविणदादा घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानात करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान व पै. प्रविण घुले पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर आणि हिंदी मराठी चित्रपटातील गीतांवर प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक,रुपाली भोसले तसेच प्रियदर्शन जाधव आदींचा नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास निकत, विजय मोरे, महेंद्र धांडे, अमोल भगत, अमोल कदम,राजू बागवान,भोप्याभाई सय्यद, गणेश वाळुंजकर, मुन्नाभाई काझी, दादासाहेब सुरवसे, रिकी पाटील, जय गोहेर दीपक बोराटे, रामभाऊ जागीरदार, सौरभ पाटील, शिवम कांबळे गणेश क्षीरसागर, सुजित घोरपडे, जोयाभाई सय्यद, प्रणित पाटील, प्रमोद पठाडे, यश पाटील, दत्ता गोडसे, शेखर पठाडे चंद्रकांत शेलार, धनंजय भगत, अनिकेत थोरात, माजिद पठाण तसेच पै.प्रविणदादा घुले पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.