शिव आरोग्य सेनेच्या तालुका अध्यक्षपदी दादासाहेब लोंढे यांची निवड.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कट्टर सक्रिय शिवसैनिक व भाजी व्यापारी दादासाहेब लोंढे यांची शिव आरोग्य सेनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी मुंबई येथे शिवसेना भवनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई उपनेते शरद कोळी यांच्या हस्ते कर्जत तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दादासाहेब लोंढे यांना देण्यात आले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दादासाहेब लोंढे यांच्या रूपात खऱ्या अर्थाने तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिकांला न्याय मिळाला म्हटले तरी वावग ठरणार नाही. यावेळी शिवआरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष इतिहान शेख राशीन शहर प्रमुख नाझीम काझी उपस्थित होते. यादरम्यान साजिद काझी यांची राशीन शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदी,
कर्जत तालुका उपाध्यक्षपदी किरण सुपेकर व सचिव पदी अली पठाण यांची नेमणूक करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. या निवडीबद्दल उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख बळीराम यादव, शिवसेनेचे नेते संतोष काशीद, अमृत लिंगडे, सुभाष जाधव, विलास रेणुकर, विलास कानगुडे, अमृत जंजिरे, औदुंबर देवगावकर, भारत गेहलोत, आदी शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी दादासाहेब लोंढे व इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.