सहाय्यक फौजदाराचा जीव घेणारा आरोपी व खुन, जबरी चोरी, दरोड्यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कर्जत पोलिसांकडून जेरबंद

कर्जत (प्रतिनिधी) :- आरोपी राजु उर्फ सुदर्शन नारायण पवार रा. वाळुंज ता. जि. औरंगाबाद यांच्या वर गुजरात मधील सुरत शहर व परिसरामध्ये घरफोडया, जबरी चोरी, दरोडा सारखे 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याचा सुरत पोलीस शोध घेत असताना एक दिवशी सुरत पोलीसांना वरील आरोपी सुरत ग्रामीम मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा गेला होता. त्या वेळी आरोपी व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. चकमकी वेळी पोलीसांचा दारु गोळा संपल्याने वरील आरोपीने सहायक फौजदार यांच्या डोक्यात दगड घालुन त्यांचा खुन करुन तेथुन पळ काढला होता . त्यामुळे या आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी जेल मध्ये असताना आरोपी राजु उर्फ सुदर्शन नारायण पवार हा जेल तोडुन फरार झाला होता. त्याच्या विरुध्द अथर्व लाईन पोलीस स्टेशन सुरत शहर गुजरात येथे गु.रजि. नं. 212/2005 भा. द. वि. क. 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा 20 वर्षापासुन गुजरात पोलीसांना गुंगारा देवुन आपले अस्तित्व लपवुन वावरत होता.
सदर आरोपी हा कर्जत पोलीस स्टेशनचे हद्दीत दुरगाव शिवारात आला असल्याची माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांना मिळताच पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी कोंम्बींग ऑपरेशन राबवुन सदर आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. या आरोपीस पुढील कारवाई साठी सुरत शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे
यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या केलेल्या कारवाईत पो.उप निरी. प्रदिप बोऱ्हाडे, पोहेकॉ संभाजी वाबळे, पोना रविंद्र वाघ, पोकाँ दिपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अमित बरडे, गोरख जाधव, राणी पुरी, सेवानिवृत्त सहायक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस मित्र महेश जामदार आदींनी केली आहे.