ब्रेकिंग
अहमदनगर येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन.

Samrudhakarjat
4
0
1
9
1
2
राशीन (प्रतिनिधी ):-जावेद काझी. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा विकास आराखडा बाबत जिल्हा परिषद खाते प्रमुख, राज्य शासन विभागांचे जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांचे GPDP/BPDP/DPDP संबंधीचे प्रशिक्षण/कार्यशाळेचे आयोजन व हॉटेल यश पॅलेस, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे सदरील प्रशिक्षण जिल्हा परिषद खातेप्रमुख, गट विकास अधिकारी व शासनाच्या जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे विभाग प्रमुख यांचा सहभाग होता.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी दिप प्रज्वलन करतांना प्रविण प्रशिक्षक अशोक सब्बन, मा. दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रमपंचायत विभाग जिल्हा परिषद अहमदनगर व इतर मान्यवर उपस्थित होते.