राशीन मध्ये राम शिंदे यांचे निकाला अगोदरच विजयी फलक झळकले.

राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून प्रा.आ.राम शिंदे× आ.रोहित पवार अशी चुरशीची लढत यावेळेस बघावयास मिळाली मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. परंतु सध्याची विधानसभा निवडणुकीची परिस्थिती पाहता राम शिंदे यांचे पारडे जड दिसत असून भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी व नेतेमंडळी यांच्या मते प्राध्यापक राम शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयाच्या उंबरठ्यावर दिसत असल्यामुळे भाजपा युवा नेते व राम शिंदे यांचे कट्टर खंदे समर्थक साहिल काझी यांनी महात्मा फुले चौकात प्राध्यापक राम शिंदे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचा फलक निकालाअदोगरच लावल्यामुळे अनेकांच्या भावल्या उंचावल्या असून राजकीय वर्तुळात उद्याच्या येणाऱ्या निकालाची चर्चा जोर धरू लागली आहे. तसेच साहिल काझी यांच्या मते राम शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. भाजपाला मतदान केलेल्या तमाम राशिनकर मतदार बंधू भगिनी व लाडक्या बहिणींचे साहिल काझी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.