गर्भवती मातेला वेदनादायक प्रसूतीकळा सुरू असताना आई व बाळाचा प्राण वाचवनारा आवलिया शेखर जाधव.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :-
राशीन: शेतातील कोपेतच एका गरोदर मातेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला.या गरोदर मातेला प्रसूतीच्या वेदना अश्या कठीण परिस्थितीत राशीन मधील ॲम्ब्युलन्स चालक शेखर जाधव याने तत्परता दाखवत गर्भवती मातेला कोपेत घेऊन अवघ्या अर्ध्यातासाच्या आत तत्काळ प्रसूती करून गरोदर माता आणि तिचे बाळ दोघांचेही जीव धोक्यातून बाहेर काढल्याची घटना नगर जिल्ह्यातील राशीन पासून काही अंतरावर असलेलं वायसेवाडी गावात 19 जानेवारी रोजी घडली.
ॲम्ब्युलन्स चालकानी दाखवली तत्परता
सविस्तर वृत्त असे की, पूजा साईनाथ चव्हाण (२5) ही मूळची चाळीसगाव येथील रहिवासी असून ती वायसेवाडी येथे आपल्या कुटुंबा सोबत ऊसतोडी आली होती. ती घरी काम करत असतानाच आठव्या महिन्यात तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला वेदना सहन होत नसल्याने राशीन चे रुग्णवाहिका चालक यांना वायसेवाडी येथील निलेश पावणे यांचा कॉल आला व आम्ही दोघेजण रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी पोहचलो तिथे जाऊन परीस्थिती पाहिली असता
बाळाचा डोकं प्रसूतीसाठी फिक्स झाल्याचे आढळले. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. अन्यथा बाळ आणि मातेचा जीव धोक्यात येणार होता.मात्र,ती रुग्णवाहिकेत बसण्याच्या स्थितीत नव्हती मात्र, माता आणि बाळाला वाचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने शक्कल लढवत शर्तीचे प्रयत्न करत तत्परता दाखवली.
कठीण परिस्थितीत ती शक्कल लढवत घरच्या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने गरोदर मातेला व तिच्या सासूबाईला धीर देत गरोदर मातेची सुखरूप प्रसूती केली.19 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तिची सुखरूप प्रसूती झाली असून मुलगा जन्माला आला. त्या नंतर माता आणि बाळाला शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेतून राशीन मधील खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी करून आई व बाळ सुखरुप आहेत असं सांगितल
अशा वेळी सर्वतोपरी प्रयत्न करून आईला आणि तिच्या बाळाला योग्य औषधोपचार करून योग्य ते उपचार दिले .एका रुग्णवाहिका चालकाच्या तत्परते मूळे तिची सुखरूप प्रसूती झाली.माता व बाळाला रुग्णवाहिकेतून घरी सोडवत जाधव यांनी माणुसकीचा धर्म जपत माता व मुलाला जीवदान दिले. त्याच्या या कार्याबद्दल राशिन व परिसरात शेखर वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.