सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जतमध्ये रास्ता रोको

मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींविरुद्ध तात्काळ खुनाचा गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीचा शोध घेऊन या गुन्ह्यामध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावेत, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे.
या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना तात्काळ अटक करावी आणि या खून प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढून दोषींवर कडक कारवाई करावी, असे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कर्जत तालुका सकल मराठा समाज प्रमुख समन्वयक रावसाहेब महादेव धांडे सकल मराठा समाजाचे हे आंदोलन शांततामय वातावरणात पार पडले, मात्र प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.