जिल्हा परिषद शाळेच्या वाटेवरील झालेल्या उंच ड्रेनेज लाईन मुळे मुलांच्या अपघातात वाढ.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन मध्ये दौंड धाराशिव उस्मानाबाद राज्यमाग रस्त्याचे ड्रेनेज लाईनचे काम मुख्य बाजारपेठेतून सुरू असून जिल्हा परिषद शाळेजवळ संविधान चौकात रस्त्यालगत झालेली ड्रेनेज लाईनची उंची जास्त असल्याकारणाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता व दौंड धाराशिव दोन्ही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना व पालकांना खडतर प्रवास करावा लागत असून या जागेवर वेळोवेळी छोटेअपघात देखील होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांनी उंच झालेल्या ड्रेनेज(गटार) वरून सोयीस्कर जाण्या येण्यासाठी रस्ता करावा जेणेकरून लहान मुली,मुलांना, पालकांना व इतर नागरिकांना त्रास होणार नाही व अपघातही होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अन्यथा
यापुढे या रस्त्यावर काही अपघात व दुर्घटना झाल्यास संबंधित प्रशासनास जबाबदार धरले जाईल. अन्यथा राशीन ग्रामस्थांकडून शाळेतील मुलांच्या पालकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा जहरी इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे