राशिन मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राशीन येथे मोठ्या उत्साहात फटाकड्याची आतिषबाजी करीत ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली. प्रथम लोकाभिमुख सरपंच नीलम साळवे, मा. सभापती पै. श्याम कानगुडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे चौकात मातंग एकदा आंदोलन व एबीएस ग्रुप तर्फे जयंतीनिमित्त प्रतिमापूजनचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास युवक नेते विक्रम राजे, अँड. सुरेश शिंदे, अँड युवराज राजे भोसले, परीट वाडीचे सरपंच विलास काळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, देविदास उकिरडे. पोलीस हवालदार मारुती काळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर, पत्रकार दत्ता उकिरडे, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, अमोल जाधव, पवन जांभळकर, विखेंचे समन्वयक अमोल शेटे, सचिन साळवे, मातंग एकता आंदोलनाचे राशीन शहराध्यक्ष संतोष ढावरे, राजेंद्र ढावरे, गणेश उकिरडे, आनंद उकिरडे, माऊली उकिरडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.