मराठी अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल डॉ. संदीप सांगळे यांचा दादा पाटील महाविद्यालयामार्फत सन्मान

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत, जि. अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यायात माजी विद्यार्थी संघटनेची सभा नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांचा सन्मान करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संजय नगरकर व समवेत माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सुभाष तनपुरे, मा. बाळासाहेब साळुंखे, मा. तात्यासाहेब ढेरे , मा. गणेश जेवरे, मा. आशिष बोरा, मा. भास्कर भैलुमे , मा. प्रकाश धांडे सर, माजी मराठी विभागप्रमुख प्रा.भास्कर मोरे सर, मा. प्रसाद ढोकरीकर, जेष्ठ साहित्यिक मारुतराव वाघमोडे,. दीपक शिंदे, सुनील शेलार, अमित तोरडमल, सागर लाळगे, वैभव थोरात, डॉ. संतोष भुजबळ, भाऊसाहेब रानमाळ, विजय तोरडमल, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक मा. डॉ. संजय ठुबे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. संदीप सांगळे यांनी दादा पाटील महाविद्यालयात शैक्षणिक जडणघडण झाल्याचे सांगितले. ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयाने केलेला माझा सन्मान हा सर्वोच्च असल्याचे त्यांनी सांगितले. १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालय नॅक समितीला सामोरे जात आहे. माजी विद्यार्थी म्हणून मी निश्चितच त्यादिवशी उपस्थित राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नवीन शैक्षणिक धोरणात होणाऱ्या बदलास सामोरे जाण्यासाठी मराठी विषयाचा सशक्त अभ्यासक्रम बनवला जाईल व त्यासाठी आपणा सर्वांची मदत लागेल असेही त्यांनी सांगितले.