संकेत भोसले मारेकऱ्यांना फाशी द्या भीमसैनिक व इतर पक्ष संघटनांचा निषेध मोर्चा राशिन पोलिसात निवेदन देत निषेध नोंदवला.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- भिवंडी येथील संकेत सुनील भोसले याची काही समाजकंटकांनी हत्या केली त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व कर्जत तालुक्यातील कोंडाणे या गावातील चैतन्य अशोक गायकवाड याचा संशयास्पद मृत्यू झाला याचा तपास करून लवकरात लवकर आरोपी पकडावे व महाराष्ट्रात घडलेल्या आत्तापर्यंतच्या दलित हत्याकांडाची SIT चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून दिनांक5/3/2024रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राशिन येथून निघालेला निषेध मोर्चा झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करीत राशीन दूरशेत्र (पोलीस चौकी)
येथे जाऊन निवेदन देऊन निषेध नोंदवला यावेळी वंचित बहुजन आघाडी, RPI(A), स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याचबरोबर काही मान्यवरांनी निषेध नोंदवला यावेळी नाझीम भाई काझी, विकी साळवे ,अतुल साळवे , दादा आढाव, अंकुश साळवे, कमलेश साळवे, निलेश चव्हाण, किरण जाधव, आयाज सय्यद, दत्ताभाऊ आढाव, सागर गायकवाड, प्रवीण साळवे, गणेश साळवे, आकाश बेपारी, अमर कांबळे, सुनील चितारे, दादा लोंढे, गुरुलिंग साळवे, आनंद आढाव, विकास साळवे, शुभम उजागरे, सुरज साळवे, प्रेम दामोदरे, विशाल गंगावणे, भाऊसाहेब साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.