आकाश साळवे व गजानन माकुडे यांना मिळालेली वकील पदवी! इतर तरुणांना प्रेरणा घेणारी : शंकर देशमुख

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी :- राशिन मधील आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या आकाश तुकाराम साळवे व गजानन महादेव माकुडे या दोघांनी घरची परिस्थिती हालाकीची असताना जिद्द मेहनत चिकाटी परिश्रम असा संघर्षमय खडतर प्रवास करीत वकील पदवी प्राप्त केल्याबद्दल राशिन
चे मा. उपसरपंच /ता. दूध संघाचे अध्यक्ष शंकर दादा देशमुख मित्र मंडळाच्या वतीने साळवे व माकुडे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ घेऊन महात्मा ज्योतिबा फुले चौकात भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शंकर दादा देशमुख म्हणाले. आकाश साळवे यांनी तेरा वर्ष बॅटरी दुकानात काम करत स्व कष्टावर कुठलाही आर्थिक आधार नसताना मेहनत परिश्रम घेत वकील पदवी प्राप्त करीत संघर्षमय जीवनातील बघितलेले स्वप्न साकार केले आहे
तसेच गजानन माकुडे यांचे अतिशय लहान वय असताना पिता महादेव माकुडे यांचे निधन झाले. न खचता न डगमगता आई सोबत कुटुंबातील प्रपंचाची जबाबदारी स्वीकारत वडिलोपार्जित असलेला खारेमुरे तसेच उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत विकण्याचा व्यवसाय 19 वर्ष गाड्यावर फिरून करत जिद्द चिकाटी परिश्रम मेहनत करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करून स्वबळावर वकील पदवी प्राप्त करून स्वप्न साकार केले आहे.
या दोघांनी स्वबळावर मेहनत परिश्रम जिद्द जोपासत वकील प्राप्त केली हे इतर होतकरू तरुणांसाठी बोध घेत नक्कीच प्रेरणादायी असल्याचे शंकर दादा देशमुख यांनी सांगितले यावेळी प्रगतशील शेतकरी भारत साळवे,भाजपा राशिन शहराध्यक्ष शिवाजी काळे, शिवसेना राशीन शहराध्यक्ष / ग्रामपंचायत सदस्य नाझीम काझी, विशाल काळे सर,दीपक शेटे , ईश्वर सोनवणे, आशु तांबोळी, तुकाराम सायकर, प्रदीप सायकर, गोटू धनवे, दत्ता आढाव, जीवन कांबळे, सतीश झगडे, केशव काळे, इतर मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.