घोडमधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश – उन्हाळी पिकांना होणार फायदा

समृध्द कर्जत प्रतिनिधी :- दिनांक १२ – घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन क्रमांक २ सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असून यामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे कुकडीसह घोड प्रकल्पाच्या पाणी नियोजनाची बैठक घेऊन शेतकयांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी जलसंपदा विभाग यांना दिले होते. त्यानुसार आज घोड प्रकल्पातून उन्हाळी
आवर्तन क्रमांक दोन सोडण्यात आले आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी, चारा पिके, ऊस आणि उन्हाळी पिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट