उडीद बियाण्यात निर्मलने केली शेतकऱ्यांची फसवणूक,
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड, कृषी विभागाकडे तक्रारी दाखल.

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- मोठ्या प्रमाणावर जाहीरात करून छातीठोकपणे उत्पन्नाची हमी देत निर्मल कंपनीने उडीद बियाणांची विक्री केली मात्र कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उडदाला शेंगाच आल्या नाहीत, याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत, नुकसान भरपाई मिळावी तसेच बोगस बियाणे तयार करुन त्यांची विक्री करणारी कंपनी व दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
…..हमखास हमीभाव व कमी मजूरांवर तयार होणारे पिक म्हणून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उडीद पिकाला पसंती दिली, सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली, यावर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाला, यामुळे उडीदाचे पिक जोमदार आले, काही शेतकऱ्यांनी तण नाशकाची फवारणी केली तर काही शेतकऱ्यांनी खुरपणी केली, पिक जोमदार आले पण त्यांना फुल आलीच नाहीत शेंगा लागल्या नाहीत या प्रकाराने शेतकरी खडबडून जागे झाले,
उडीदाचे बियाणे ज्या दुकानात खरेदी केले ती खरेदी बिले लावून कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी व कर्जत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे हे तक्रारी केल्या आहेत बोगस बियाणे तयार केलेल्या निर्मल कंपनीवर व या बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच १०० टक्के नुकसान भरपाई मागणी केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. फसवणूक झालेले शेतकरी असे – हरिश्चंद्र किसन तांदळे ( बहिरोबावाडी) रामचंद्र बाबुराव तोरडमल (बहिरोबावाडी) रघुनाथ बाबुराव जगताप (बहिरोबावाडी) मच्छिंद्र काशीनाथ शिंगाडे
(बहिरोबावाडी) रणजित रामराव तोरडमल (बहिरोबावाडी)नारायण गेणा तांदळे (बहिरोबावाडी) गोरख काशिनाथ शिंगाडे (बहिरोबावाडी) अनिकेत गोदड तांदळे (बहिरोबावाडी) धनराज काशिनाथ तांदळे (बहिरोबावाडी) शांताबाई सुरेश मांडगे (बहिरोबावाडी) नवनाथ धोंडीबा तांदळे (बहिरोबावाडी) शर्मिला हरिश्चंद्र सोमासे (कापरेवाडी) रायचंद दामु सोमासे (कापरेवाडी) अण्णासाहेब गणपत थोरात (कापरेवाडी) नामदेव अण्णा सांगळे (टाकळी खंडेश्वरी) बोगस बियाणे विक्री करणारे कृषी सेवा केंद्र असे – भोसले कृषी उद्योग भांडार कर्जत, संत गजानन कृषी सेवा केंद्र माहिजळगांव, शेतकरी बाजार माहिती कृषी सेवा केंद्र कर्जत, कोटलिंग कृषी सेवा केंद्र कर्जत, कृषी सेवा केंद्र कर्जत, सद्गुरु कृषी सेवा केंद्र कर्जत, सद्गुरू सिडस अँड फर्टिलायझर कर्जत.