नागापुर उपसरपंचाचा निवड झाल्या नंतर लगेच भाजपा प्रवेश

कर्जत (प्रतिनिधी) :- नागापुर ता.कर्जत येथील आज शनिवार दि.३०/१२/२०२३ रोजी ग्रा. प .उपसरपंच निवड झाली . यामध्ये सौ उज्वला नवनाथ निंबोरे यांची नागापुरच्या उपसरपंच पदी निवड झाली . निवड झाल्या नंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करणेत आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
” आपण यापुढे आमदार प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा च्या राजकीय विचारसरणीशी प्रामाणिक राहून काम करणार आहोत ” असे सत्काराला उत्तर देताना त्यांनी म्हटले त्यांची निवड झाल्या नंतर लगेच भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, संपत बावडकर यांचेशी चर्चा करून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले .त्याप्रमाणे आ.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते कर्जत येथील कार्यालयात त्यांनी भाजपा मध्ये अधिकृत रित्या प्रवेश केला.
भाजपाच्या विचार धारेशी प्रामाणिक राहून काम करा. प्रामाणिक माणसाला भाजप मध्ये न्याय मिळतो अशा शब्दांत आ. राम शिंदे साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.भाजपा मध्ये सौ.उज्वला नवनाथ निंबोरे सह पती नवनाथ निंबोरे,सुशांत नामदेव निंबोरे महेंद्र सोपान निंबोरे, रामदास नामदेव निंबोरे ,राहुल निंबोरे, नामदेव बलभीम निंबोरे,विक्रम माणिक निंबोरे यांनी माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे,तालुका अध्यक्ष शेखर खरमरे ,बाजार समिती चे सभापती काकासाहेब तापकीर , कुकडी कालवा सल्लागार समितीचे काका धांडे, माजी सभापती बाप्पू शेळके,संपत बावडकर, काका ढेरे, मा.सरपंच सारंग घोडेस्वार,राहुल निंबोरे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
बदललेल्या राजकीय परिस्थीतीत आता दादागिरी दडपशाही व दहशतीला झुगारून सर्वसामान्य नेते जनता आता भूमिपुत्र नेत्याच्या पाठीशी उभी राहत आहे.आपला तो आपलाच असतो आणि विकासाभिमुख नेतृत्व आमदार प्रा .राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी कर्जत जामखेडचे नागरिक प्राधान्य देत आहे असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सांगितले .