जिजाऊ इंग्लिश स्कूल मिरजगावमध्ये उत्साहात साजरा.

कर्जत (प्रतिनिधी): – जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये अनेक लहान चिमुकल्यानी उत्कृष्ट देशभक्ती पर भाषणे, गाणी, तसेच पुलवामा attak यावर 10 ते 15 मिनीट चे सुंदर असे नाटक सादर केले तसेच मंथन परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळाले अश्या कु श्रावणी राजेश पाचपुते व कु कार्तिक हाऊराव रोटे यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रावसाहेब नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश खेतमाळस यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले.तसेच उद्धव नेवसे, डॉ सुभाष सूर्यवंशी,डॉ काळदाते,पाचपुते मेजर, पत्रकार बबन म्हस्के पचकृषितील सर्व पालक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जावेद मंडप यांचे उत्कृष्ट डेकोरेशन होते त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रम मंथन परीक्षेत मिळालेल्या मुलांचे कौतुक केले मुलांनी जी देशभक्तीपर भाषणे व पुलवामा attak नाटक सादर केले तसेच शिक्षकांनी विद्यार्थीची चांगली तयारी करून घेत शिक्षकांना असेच विद्यार्थीना मार्गदर्शन करून विद्यार्थी घडवावेत अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच सहाशिक्षका उर्मिला त्र्यंबके, सरिता लाढाणे, सुरेखा शेलार, निकिता माळवदे , प्रतिक्षा उल्हारे, प्रियदर्शनी मुंगीकर, आशा पवार, दत्तात्रय सकट, पांडुळे काका, संतोष कोरडे,दत्त खेडकर, दादा बाबर, प्रणव वतारे, विशाल म्हस्के, क्रिश शिंदे यांच्या सहकार्याने उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडला.