बंधन-नातं विश्वासाचं, सन्मानाचं’ रक्षाबंधन सोहळा कार्यक्रम ५५ हजार महिलांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला..

समृध्द कर्जत वृत्तसेवा :- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी ‘बंधन-नातं विश्वासाचं, सन्मानाचं’ हा रक्षाबंधन सोहळा तालुक्यातील पाटेगाव येथे रविवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला होता. या रक्षाबंधन सोहळ्याला मतदारसंघातील माता- भगिनींनीचा मोठा प्रतिसाद लाभला. या वेळी सुमारे ५५ हजार महिला उपस्थित होत्या. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती हा सोहळा रात्री नऊ वाजेपर्यंत रंगला.
या वेळी कर्जत-जामखेड मतदारसंघात हजारो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेला रोहित पवार यास असलेला पाठिंबा पाहून खूप आनंद झाला. या मतदारसंघातील जनतेसाठी रोहित पवार खूप कष्ट करत आहे. आम्हा सर्व पवार कुटुंबीयांना रोहित पवारचा अभिमान वाटतो. आपण सर्व माता भगिनी अशाच पद्धतीने रोहित पवार यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले. प्रसिद्ध गायक जुईली जोगळेकर आणि इंडियन आयडल फेम रोहित राऊत यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी झाला.
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडसाठी ३.८८ कोटी रुपये खर्चुन पूर्ण केलेल्या कर्जत पंचायत समितीचा पहिला मजला, १ कोटी रुपये खर्चाचे स्व. जीवनराव ऊर्फ बापूसाहेब ढोकरीकर अत्याधुनिक अग्निशमन केंद्र या विकासकामांचे लोकार्पण आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १९ कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधायुक्त निवासस्थाने उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होत्या आमदार रोहित पवार म्हणाले, की तब्बल ५५००० महिला या स्वाभिमानी व बंधन मेळाव्यासाठी उपस्थित आहेत, हे पाहून मी भारावून गेलो आहे. अशाच पद्धतीने आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहा. मी हा तुमचा लाडका भाऊ दिल्लीच्या तक्तासमोर किंवा ईडीसमोर झुकणार नाही. कर्जत जामखेड मतदार संघातील सर्व मतदारांनी मला संघर्ष करण्यासाठी शिकवले आहे. पुढील काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून या ठिकाणीच महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर एमआयडीसी सुरू करणार, असेही ते म्हणाले.