दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शिकत असलेल्या विविध विभागातील विद्यार्थ्यांची नुकतीच विविध शासकीय पदांवर निवड झाली आहे.
विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम आबासाहेब सुद्रिक (इंडियन आर्मी), सोनाली जगताप (वनरक्षक अधिकारी), ऋषिकेश विठ्ठल सुपेकर (ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर, आयडीबीआय बँक), तृप्ती कैलास जाधव (ज्युनिअर मॅनेजर, एचडीएफसी बँक), माजी विद्यार्थी राहुल गजानन धनावडे (महाराष्ट्र नगरपरिषद, कर निर्धारण अधिकारी) सागर शिवाजी बागल (कर सहाय्यक अधिकारी), योगेश बाळू धनवडे (सहकार अधिकारी), दिपाली बाळू मोहोळकर (वनरक्षक अधिकारी), निकिता बाबासाहेब पडोळकर (दंत सहाय्यक, ग्रामीण रुग्णालय पारनेर), अश्विनी शिंदे (वनरक्षक अधिकारी) या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले