पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शशिकांत लोंढे यांचा हशु आडवाणी विद्यालयात सन्मान….!!

राशीन (प्रतीनिधी) :-जावेद काझी. :- समाज विकास संस्थेचे हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे राशीन गावचे सुपुत्र श्री.शशिकांत निवृत्ती लोंढे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अल्लाउद्दीन एस.काझी हे होते.यावेळी अँड.निवृत्ती लोंढे साहेब,उद्योजक श्री.सुरज कानडे , समाज विकास संस्थेचे संचालक श्री. साहिलदादा काझी इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पी.एस.आय श्री.शशिकांत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साधण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याचा आपला अनुभव सांगितला.परिपूर्ण तयारी करून स्वतःच्या अभ्यासाने कोणत्याही खाजगी क्लास शिवाय त्यांनी हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन एस.काझी यांनी मा.अँड.लोंढे साहेब यांनी पिता म्हणून पार पडलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल काळे यांनी केले. तर आभार श्री.आजिनाथ शिंदे सर यांनी मानले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेंद्र नष्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.