दादा पाटील महाविद्यालयात मुलांच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत दादा पाटील महाविद्यालय कर्जत व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय मुलांच्या कुस्ती स्पर्धा नुकत्याच महाविद्यालयात संपन्न झाल्या
या स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्रतात्या फाळके, उपमहाराष्ट्र केसरी मा. नाना मोढळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक संचालक डॉ. दत्ता महादम यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. यशिवाय या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, प्रा. राजेंद्र देवकाते सर, विविध महाविद्यालयातील शारीरिक संचालक तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते
या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे शहर येथील कुस्ती संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आलेले सर्व संघ व त्या संघाचे प्रशिक्षक यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. संतोष भुजबळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. शिवाजी धांडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले
या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांचे अभिनंदन केले.