राशिन भिगवण मार्गावर झालेल्या भीषण अपघातात योगेश काळे युवकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास औटेवाडी खेड येथून फॅब्रिकेशन चे काम उरकून राशीनच्या दिशेने निघालेल्या तीन युवकांचा राशीन भिगवन रस्त्यावर चौकीच्या लिंबाजवळ हॉटेल वृंदावन समोर भरधाव वेगाने येणाऱ्या नेक्सान गाडी नंबर mh.42 bb 5699. फोर व्हीलर गाडीचा व बजाज प्लेटिना गाडी न. mh 16 ct 4279 मोटार सायकलचा भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात, योगेश उर्फ(पप्पू) बाळासाहेब काळे. वय वर्ष 27 राहणार कुंभार गल्ली राशिन या युवकाचा मृत्यू झाला असून, अरबाज सय्यद रा. राशीन.वर्ष 25 व सागर भाकरे वय वर्ष 29 राहणार देशमुखवाडी राशिन हे दोघे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने ॲम्बुलन्स द्वारे महालक्ष्मी हॉस्पिटल राशीन येथे अतिदक्षता (i.c.u.) विभागात तात्काळ ऍडमिट करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा रक्तस्राव वाहत असल्यामुळे ब्लड प्रेशर लो असताना डॉ. नितीन खरात, डॉ. युवराज शिंदे, डॉ. कृष्णकांत गावंडे,व इतर टीमने तत्पर औषध व उपचाराची सेवा देत जीवदान देण्याचा प्रयत्न केला हे सर्व (icu) मुळेच शक्य झाले.
पुढील उपचारासाठी गंभीर जखमी झालेल्या अरबाज ला विश्वराज हॉस्पिटल लोणी पुणे ,तर भाकरे याला भिगवन आय.सी.ओ. येथे ऍडमिट करण्यात आल्याची माहिती ॲम्बुलन्स मालक सुरेश कोंडलकर यांनी दिली. तर मयत योगेश काळे याला पोस्टमार्टम साठी उप जिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेण्यात आले होते. योगेश चा अंत्यविधी पहाटे तीन वाजता राशीन येथे झाला. योगेशच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने राशीन व परिसरात हळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. योगेश च्या पाठीमागे वडील बाळासाहेब काळे, आई संगीता काळे, भाऊ निलेश, भाऊजय स्वाती, बहिण दिपाली असा मोठा परिवार आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.