जगदंबा देवी मंदिराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याची वहिवाट रात्रीतून बंद! राशीन शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन सुरू.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी. राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पश्चिम बाजूस असलेला जगदंबा देवी मंदिराकडे जाणारा येणारा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता रात्रीतून गटारीवर उंच टाकल्याने बंद झाल्यामुळे उबाठा शिवसेनेचे कर्जत जामखेड चे समन्वयक सुभाष जाधव व इतर नागरिकांच्या वतीने वहिवाटीसाठी बंद पडलेला रस्ता पूर्ववत खुला करण्यात यावा यासाठी बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन आज सकाळी १० वा.पासून सुरु झाले आहे. आंदोलकांच्या मते राशीन शहरातून दौंड- धाराशिव राज्य मार्ग रस्त्याच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू असून ते काम राजपथ इन्फ्रा कंपनी करीत आहे. संबंधित यंत्रणेला हाताशी धरून चिरीमिरी घेऊन धनदांडग्या व्यक्तीचे ऐकून अनेक वर्षापासूनचा सार्वजनिक खुला रस्ता वहिवाटीस अडथळा होईल असा उंच स्लॅब गटारीवर टाकलेला असून तो स्लॅप काढून रस्ता खुला करून गावामध्ये व इतर ठिकाणी ज्याप्रमाणे रस्ता क्रॉसिंग साठी खाली टाकलेला आहे त्याप्रमाणे करण्यात यावा तसेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या रस्त्यावर देखील गटारी वरील स्लॅब उंच झालेला आहे त्याची उंची देखील कमी करणे यावी अशी मागणी शिवसेना नेते सुभाष जाधव व मंगळवार पेठ समस्त ग्रामस्थ यांच्याकडून बेमुदत उपोषण व घंटांना आंदोलन सुरू करण्यात आले
असून याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेब कर्जत, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस निरीक्षक कर्जत, इन्फ्रा कंपनी व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. जोपर्यंत हा रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी खुला होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील अशी माहिती शिवसेनेचे सुभाष जाधव यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, अशोक जंजिरे, दिलीप मासाळ, समीर तांबोळी, भीमराव साळवे, किरण जाधव, मा. सरपंच देवा उकिरडे, परेश रमलालाच्या अच्छा, अंबादास भगवान जाधव, आरपीआयचे रवींद्र दामोदरे, व इतर ग्रामस्थांनी ह्या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे.