दादा पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
जागतिक पातळीवर दर्जा मिळावा याकरिता दादा पाटील महाविद्यालय कायम प्रयत्नशील आहे...राजेंद्र तात्या फाळके

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ महाविद्यालयामध्ये नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्र तात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके, तात्यासाहेब ढेरे, महादेव तांदळे, अमित तोरडमल, सागर लाळगे, प्रशांत गायकवाड,पत्रकार गणेश जेवरे आदि मान्यवर व सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. वनदास पुंड यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विविध कामगिरीचा आलेख अहवालरूपाने सादर केला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या डायनामिक वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
जिमखाना विभाग प्रमुख डॉ. संतोष भुजबळ यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचा अहवाल सादर केला. क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी प्रा. शिवाजी धांडे यांनी उपस्थितांसमोर मांडली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध कलाप्रकारात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.
महाविद्यालयाच्या एनसीसी व पॅरा मिलिटरी विभागाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय, राज्य व विभागीय पातळीवरती व विविध उपक्रमांमध्ये जी चमकदार कामगिरी केली त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सर्व एनसीसी कॅडेटचा सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालयातील विविध प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रामध्ये व विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये नावलौकिक मिळवला आहे, अशा सर्वांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात राजेंद्रतात्या फाळके यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा प्रकारात, सांस्कृतिक विभागात, एनसीसी, एनएसएस व विविध उपक्रमांमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी हे आमच्या महाविद्यालयाची शान असल्याचे नमूद केले. महाविद्यालय मोठ्या उंचीवरती या गुणवंत विद्यार्थ्यांमुळेच पोहोचणार आहे. महाविद्यालयाची डायनॅमिक वेबसाईट म्हणजे महाविद्यालयाचा लेखाजोगा आहे. तो जगाला कळाला पाहिजे हे दर्शविण्यासाठीच या वेबसाईटचा फायदा सर्वांना होईल. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालयाने कोट्यवधी स्वरूपाची शैक्षणिक कामे केली. महाविद्यालयाला जागतिक पातळीवरती दर्जा मिळावा यासाठीच महाविद्यालय कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात आज मिळवलेली वाहवा ही भविष्यकाळात आयुष्यभर शिदोरी म्हणून उपयोगी पडेल.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने ‘खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या खाद्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांमार्फत खाद्यपदार्थांचे २५ स्टॉल लावण्यात आले होते. या खाद्य महोत्सवाचा महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी लाभ घेतला.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या नावाने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वासुदेव आला, भूपाळी गीत, गणेश वंदना, कानडा राजा पंढरीचा, बाई मी पतंग उडवित होते-गीत, पिंगळा गीत, दिंडी सोहळा, कोळीगीत, लावणी, जात्यावरच्या ओव्या आदि कलाप्रकार सादर केले.
प्रा. राम काळे व प्रा. स्वप्निल मस्के यांनी सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. तर आभार उपप्राचार्य व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले.
वार्षिक वितरण समारंभ, खाद्य महोत्सव, महाराष्ट्राची लोकधारा- सांस्कृतिक कार्यक्रम आदि कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. संतोष भुजबळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. भागवत यादव, ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. शिवाजी धांडे, कार्याध्यक्ष प्रा. वनदास पुंड तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विशेष प्रयत्न केले.