सोनेगाव आणि खुरदैठण येथील शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी
आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

दौंडाचीवाडी, जामखेड. जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील भाजपचे नेते छत्रभूज बोलभट यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आणि खुरदैठण येथील ज्ञानेश्वर डुचे अक्षय डुचे यांच्यासह अनेक पदाधिकार , कार्यकर्ते यांनी तुतारी हाती घेतली असून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
सोनेगाव येथील भाजपचे निष्ठावान पदाधिकारी छत्रभूज बोलभट, राहुल पवार, नीलेश बोलभट, हृषी बोलभट यांच्याह शेकडो कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या कामाने प्रेरीत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच खुरदैठण येथील ग्रामपंचायत सोसायटी संचालक व चोभेवाडी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर डुचे, अक्षय डुचे, दत्ता डुचे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली. दौंडाचीवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. राम शिंदे यांचा मनमानी कारभार आणि भाजपचे सामान्य जनतेविरोधातील धोरण याला कंटाळून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेत असल्याचे सांगितले.