गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करा राशीन ग्रामपंचायतला श्री जगदंबा विद्यालयाची निवेदन द्वारे मागणी.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयाच्या परिसरात ग्रामपंचायत मार्फत केलेल्या बंदिस्त गटारीचे दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा विद्यालयाच्या परिसरात होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे व डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत वर्गात जाताना मोठी कसरत करावी लागत आहे
यामुळे परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर देखील होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांच्या तक्रारी वाढत असून दिनांक १/४/२०२३ पासून विद्यालयाची वार्षिक परीक्षा सुरू होत आहे या अनुषंगाने आपण गटारीचे दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा बंदोबस्त ग्रामपंचायत मार्फत करावा अशा मागणीचे लेखी निवेदन जगदंबा विद्यालयाच्या वतीने राशीन ग्रामपंचायतच्या सरपंच नीलम साळवे यांना देण्यात आले आहे.