मा.आमदार रोहित पवार यांच्या हस्ते राशिन मुस्लिम समाजाच्या विविध कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- माननीय आमदार रोहित पवार यांच्या वैयक्तिक मुस्लिम अल्पसंख्याक निधीतून काझी गल्ली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळे समोरील प्रारंगनात पेविंग ब्लॉक बसवणे कामासाठी ५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच मुस्लिम समाजाच्या शादी खाना साठी १० लाखाचा निधी मंजूर करून दिला
तसेच मुंडे कब्रस्तान कंपाउंड साठी १०लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असून हे सर्व काम पूर्ण झाले असून या तिन्ही कामाचा लोकार्पण सोहळा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या केलेल्या महत्वकांशी कामांमुळे आमदार रोहित पवार यांचा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करीत सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)राष्ट्रवादी अल्पसंख्याक कर्जत तालुका अध्यक्ष इम्रान भैय्या शेख , जमीरभाई काझी, मतिन साहेब, मुसाभाई काझी,स्वालिनभाई शेख,खालीद मेजर काझी, मोशिन गुडूभाई काझी,मुख्तारभाई काझी,फारूकभाई काझी, अलाउद्दीनभाई इ काझी, खैरूनभाई काझी, हारुनभाई काझी, इलाहीभाई काझी,अल्ताफभाई काझी,मुज्जुभाई काझी, निहालभाई काझी, सद्दामभाई काझी, इक्बालभाई शेख,रोपभाई काझी, अरबाजभाई काझी, इक्बालभाई काझी,सलीमभाई जहागिरदार, समीरभाई काझी, इरफानभाई काझी वसिमवली, अल्ताफभाई शेख, राजमहंमद तांबोळी , आसिफभाई काझी, आजिजभाई तांबोळी, मौलाना शहानवाज कुरेशी, इतर मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित.
या कार्यक्रमानंतर आ. रोहित पवार यांनी मागील काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालेल्या स्वर्गवासी योगेश काळे, व पैगंबर वासी हसन सय्यद या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची घरी जाऊन झालेल्या घटनेची विचारपूस करून दुःखांकित कुटुंबांतील व्यक्तीची सांत्वन पर भेट घेतली .