बाळूमामाच्या गजरात राशिन नगरी दुमदुमली.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- गेल्या आठ दहा दिवसापासून बाळू मामाची पालखी नंबर ९ ही राशीन येथील भिगवण रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ विराजमान झाली होती. या दरम्यान दर दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरती महाप्रसाद, कीर्तन, प्रवचने अनेक धार्मिक कार्यक्रम पालखी उत्सव दरम्यान पहावयास मिळाले या कार्यक्रमास लहान मुले मुली महिला पुरुष वृद्ध मनापासून हजेरी लावीत बाळूमामाच्या पालखी उत्सवाचा आनंद घेत
दर्शन घेतले प्रत्येक दिवशी प्रसाद रूपात कणिक, अंबिल, शिपी ,आमटी, लापशी, गोड भात, पाेळी, भाजी ,फळफाळावे ,अशा अनेक पदार्थांचा प्रसाद अनेक बाळू मामा भक्तांनी घेतला अनेक भाविक भक्तांनी वेगवेगळ्या रूपात दात्यांनी अन्नदान केले. आज शेवटच्या दिवशी बाळुमामा पालखीची आरती व विधि पूर्ण करून मोठ्या उत्साहात मुख्य बाजारपेठेतून बाळूमामा पालखी ची मिरवणूक निघाली मिरवणुकीत अनेक जेसीबी द्वारे पिवळा भंडारा उधळत बाळुमामाचं चांगभलं म्हणत महिला तरुण वर्ग मुले मुलीनी बच्चे कंपनीने जल्लोसात डीजेच्या तालावर ठुमका धरत बाळूमामा पालखीचा आनंदोत्सव साजरा केला.
ही बाळू मामा ची निघालेली पालखी यात्रा ही दसऱ्याची आठवण करून देणारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा अस्मरणीय आनंद उत्सव बाळूमामा पालखीच्या रूपात राशीनकरांना अनुभव न्यास मिळाला हे नक्कीच. राशीन येथून पुढे पालखी कर्जत रोडवर सातवा मैल येथे स्थानपन्न होणार आहे.