नूतन खासदार निलेश लंकेच्या विजयाचा राशिन मध्ये जल्लोष..

राशीन( प्रतिनिधी ):-जावेद काझी. अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा विक्रमी मताने दारून पराभूत करीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा २८,९२९ भरघोष मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल राशिनसह परिसरातील नागरिकांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तुतारी, ढोल ताशा फटाक्याची आतिष बाजी करीत, किंग मेकर शरदचंद्रजी पवार साहेब, रोहित पवार,
व निलेश लंकेच्या नावाचा जयघोष करीत गुलाल उधळीत विजयी जल्लोष मोठ्या उत्साहात करण्यात आला. यामध्ये राशिन व परिसरातील युवा नेतृत्व राजेंद्र भैय्या देशमुख मित्र मंडळ कर्जत तालुका , शाहू राजे भोसले मित्र मंडळ, शंकर दादा देशमुख मित्र मंडळ, श्याम कानगुडे मित्र मंडळ राशीन, व इतर मतदार समर्थकांच्या वतीने मा. श्री निलेश लंके साहेब यांनी प्रचंड मतांनी अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) दक्षिण खासदार पदी निवड
झाल्याबद्दल वर्तमानपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन होत असून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देणारे फलक राशीन व परिसरात झळकत आहेत. विशेष बाब म्हणजे कर्जत जामखेड तालुक्याच्या झालेल्या मताच्या आकडेवारी नुसार निलेश लंकेच्या विजयाचा शिल्पकार हे दोन तालुके ठरल्यामुळे माननीय आमदार रोहित पवार यांना या यशाचे श्रेय जाते हे नक्कीच.