भाजपा च्या भटक्या-विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तात्यासाहेब माने यांची वर्णी.

राशिन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील भटक्या-विमुक्त समाजाचे नेते तात्यासाहेब माने यांची भारतीय जनता पक्षाच्या भटक्या-विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भटक्या-विमुक्त समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेत विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या शिफारशीवरून भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी माने यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करीत त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच सुपूर्द केले.
माने यांनी या अगोदर यांची भारतीय जनता पक्षाच्या भटक्या-विमुक्त आघाडीच्या प्रदेश सदस्यपदी काम केले असून आमदार प्रा.राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते कर्जत-जामखेड मतदार संघात माने यांची ओळख आहे.
या निवडीबद्दल माने यांचे आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे, भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.तानाजी जाधव, पांडूरंग भंडारे, विक्रम सिंह राजे भोसले दत्ता गोसावी, पै.शिवाजी काळे, योगेश शर्मा, सुनील काळे, सोयब काझी संकेत पाटील . अतिष धोडके . यांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले, भारतीय जनता पक्ष, आमदार प्रा.राम शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आपण कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवून जिद्द मेहनत पक्षाशी एकनिष्ठता ध्येय-धोरणे भटक्या-विमुक्त समाजाच्या पालापासून तांड्यापर्यंत पोहचवून, समाजाच्या न्याय-हक्कासाठी अग्रणी राहणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वत: हा विचार समोर ठेऊन राज्यभर भटक्या-विमुक्त आघाडीचे काम करणार आहे. राजकारणापासून कोसो दूर राहिलेला माझा भटक्या-विमुक्त समाज सामाजिक-राजकीय प्रवाहात आणण्यासाठी या पदाच्या माध्यमातून काम करणार असल्याची ग्वाही तात्यासाहेब माने दिली.