ब्रेकिंग
मराठा समाज आरक्षण समर्थनार्थ कर्जत, राशीन मध्ये कडकडीत बंद !

Samrudhakarjat
4
0
1
9
4
5
राशीन (प्रतिनिधी ) जावेद काझी. :- सकल मराठा समाजास जाहीर केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवीत कर्जत सह राशीन मध्ये आज सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण देण्याबाबत नुकतीच अधिसूचना काढलेली होती.
त्याबाबत पुढील कार्यवाही बाबत वेळ काढू पणा न करता मराठा समाजासाठी आरक्षणाची अंमलबजावणी शासन दरबारी त्वरित करावी त्याकरिता मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक.१०/२/२०२४. पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणार्थ आज कर्जत सह राशीन शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकानी आपापली दुकाने, बंद ठेवीत मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवीत 100% कडकडीत बंद पाळण्यात आला.