राशीन मध्ये शिवशक्ती युवा प्रतिष्ठान मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक इतर मंडळांना बोध घेण्याजोगी.

राशिन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.शिवशक्ती युवा प्रतिष्ठान राशीन येथील मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आठव्या दिवशी सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजन देण्यात आले. गणपती स्थापने दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच महिलांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
नवव्या दिवशी रविवारी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात आकर्षक विद्युत रोषणाई करीत शिवलिंग पिंड डेकोरेशन लाइटिंग इफेक्ट ने जळकत होते. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवस मेहनत घेतली या विसर्जन मिरवणूकीचे विशेष आकर्षण म्हणजे नारी शक्तीचा आदर्श देत हाती मुली व महिलांना वाचवयाचे असते नाचावयाच्या नसतात. तर हल्लीचे युवक स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असतात तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी कुत्रा बनू नका असा आदर्श संदेश देणारे फलक मुलींच्या नारी शक्तीच्या हाती मिरवणुकी दरम्यान दिसत होते. लहान मुलींचे हाती दिसणारे हे फलक इतर गणपती मंडळाला बोध घेण्यासारखे होते.
यावेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष/ शंकर देशमुख, माजी सभापती श्याम कानगुडे, युवक नेते भीमराव साळवे, शिवसेना उबाठा गटाचे नेते सुभाष जाधव गटाचे ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, सचिन जाधव, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकी दरम्यान आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नागरिकांचे व नारीशक्तीचे मंडळाचे अध्यक्ष/ ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी आभार मानले