एमआयडीसीचे गाजर दाखवीत राम शिंदे यांचा मतदार संघाचा वाळवंट करण्याचा प्रयत्न ; मेहत्रे.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत येथील बहुचर्चित एमआयडीसी तालुक्याच्या एका कोपऱ्यात फेकण्याचा डाव राम शिंदे यांचा असून यामुळे कर्जत जामखेड करांच्या तोंडाला पानी पुसण्याचा प्रकार असून, सूतगिरणी सारखेच हे दिव्य स्वप्न ठरते की काय, अशी भीती तालुक्यातील युवा वर्ग व जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदार राम शिंदे यांना ही किंमत मोजावी लागेल, असा इशारा कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी केला आहे. ते म्हणाले की आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराला यश येत कर्जत जामखेड तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पाटेगाव परिसरात एमआयडीसी मंजूर केली होती.
अंतिम मंजुरी बाकी असताना विरोधकांनी षडयंत्र रचून होत असलेल्या चांगल्या कामाला खोडा घातला. दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ती एमआयडीसी न करता तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात कोंबडी परिसरात श्रेयवादासाठी तो करण्याचा घाट घातला आहे. वास्तविक पाहता हे ठिकाण कोणत्याच निकषात बसू शकत नसून उद्योग येतील की नाही, याबाबत शंका आहे. हे जनतेला माहीत असून आमदार रोहित पवार यांना याचे श्रेय मिळू नये म्हणून हा आमदार राम शिंदे यांचा डाव असल्याची टीका मेहत्रे यांनी केली आहे.