दादा पाटील महाविद्यालयाचा रयत शिक्षण संस्थेकडून कर्मवीर जयंतीदिनी मा. शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत गौरव

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्मवीर जयंतीनिमित्त सातारा येथे रयत शिक्षण संस्था आयोजित कर्मवीर पारितोषिक वितरणप्रसंगी दादा पाटील महाविद्यालयाचा ‘कर्मवीर पारितोषिक’ देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीत व चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, व्हॉ. चेअरमन मा. ऍड. भगीरथकाका शिंदे, सचिव मा. विकास देशमुख( भारतीय प्रशासकीय सेवा), संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.दादा पाटील महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात ३.७१ गुणांसह अ प्लस प्लस श्रेणी प्राप्त केल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी राबवलेल्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामुळे महाविद्यालयाचा कायापालट झालेला आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, महाविद्यालय विकास समिती या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून प्राप्त झालेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाला गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, आय.क्यू .एसी. चे कॉर्डिनेटर डॉ. संदीप पै, डॉ. संतोष घंगाळे, डॉ. अशोक म्हस्के, डॉ. अशोक पिसे, डॉ. माधुरी गुळवे, डॉ. आनंद हिप्परकर, डॉ. महेश भदाणे यांनी स्वीकारला. महाविद्यालयाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार मा. रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे, माजी विद्यार्थी संघटना यांनी अभिनंदन केले.