
कर्जत (प्रतिनिधी) :- निखिल काळकुटे आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी कु.साक्षी गांगर्डे हिने व्दितीय क्रमांक पटकावला. सन्मान चिन्ह,सन्मानपत्र व ₹ ५००० रोख असे पारितोषिक मिळाले.
स्त्रीयांचे भावविश्व,महिलांना करावा लागणारा अडथळ्यांचा सामना, स्त्री जन्माची व्यथा तिने ‘ती’ या कवितेच्या माध्यमातून मांडली. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या दैदिप्यमान यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.राजेंद्र फाळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर साहेब यांच्या हस्ते कु.साक्षी गांगर्डे हिचा सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.अंबादास पिसाळ, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.तिच्या सत्कार प्रसंगी
उपप्राचार्य प्रा.डॉ संजय ठुबे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ प्रमोद परदेशी ,वाणिज्य विभाग उपप्राचार्य प्रा.भागवत यादव, नॅक समन्वयक प्रा.डॉ संदिप पै, प्रा.डॉ अशोक म्हस्के,प्रा. स्वप्नील म्हस्के आदि उपस्थित होते.
कु.साक्षी गांगर्डे हिस प्रा. स्वप्नील म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले