‘माझा वाढदिवस माझी भेट’ उपक्रमांतर्गत डॉ. दत्ता शेंडे यांच्याकडून महाविद्यालयाला पाच हजाराची भेट

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले सेवक व विद्यार्थी यांचा ज्या दिवशी वाढदिवस असतो, त्यादिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला पुस्तके व रोख स्वरूपातील देणगी भेट म्हणून दिली जाते. या उपक्रमा अंतर्गत अनेक प्राध्यापक व विद्यार्थी महाविद्यालयाला पुस्तके भेट देतात
नुकताच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्ता शेंडे यांचा वाढदिवस संपन्न झाला. सदर दिवशी डॉ. शेंडे यांनी महाविद्यालयाला पुस्तके व रोख रक्कम पाच हजार रुपये भेट म्हणून देण्यात आली, प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यामार्फत पुस्तके व देणगी महाविद्यालयाला जमा करण्यात आली.
डॉक्टर दत्ता शेंडे यांच्या या कृतीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या देणगीचा वापर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थी फंडासाठी करण्यात येतो