युनियन बँकेचे शिवाजी सोनमाळी यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार व निरोप समारंभ.

कर्जत प्रतिनिधी : – शिवाजी सोनमाळी यांनी आपल्या कर्जत राशीन खेड येथे नोकरीच्या काळात नाॅट आउट बॅटिंग केली आहे असे प्रतिपादन दादासाहेब सोनमाळी यांनी कार्यक्रमाच्या वेळी केले ते पुढे म्हणाले आपल्या नोकरीच्या काळात सुंदर काम केल्यानंतर सेवा निवृत्तीच्या निमित्ताने समाजाकडून नक्कीच चांगली पावती मिळते निमित्ताने उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी या नगरसेवक अनिल गदादे नगरसेवक सुनील शेलार माजी पंचायत समिती सदस्य मारूती सायकर युनियन बँकेचे शाखाधिकारी श्रीकांत धांडे तसेच कुटुंबियांच्या वतीने सचिन सोनमाळी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिवाजी सोनमाळी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल गदादे, युनियन बँकेचे अधिकारी श्रीकांत धांडे, माऊली थोरात, राजेंद्र चव्हाण, सुनील आगवन नगरसेविका मनिषा सोनमाळी, नगरसेवक सुनील शेलार, राजेंद्र येवले, नवनाथ कोंडे, सचिन सोनमाळी, प्रकाश खंदारे, दीपक सोनमाळी, संदीप सोनमाळी, गणेश सोनमाळी, मारुती सायकर विठ्ठल सोनमाळी, शिवाजी गोरे, उत्तमराव मोहोळकर तसेच राशीन खेड कर्जत परिसरातील मान्यवर उपस्थित होते माझ्या नोकरीच्या काळात मला चांगली साथ दिली त्यांचे श्री शिवाजी सोनमाळी यांनी मनापासून आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार सचिन सोनमाळी (मुंबई पोलीस) यांनी मानले व स्नेह भोजणाचे आयोजन देखील केले होते.