कर्जत शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये ५० वी वेदनाविराहित प्रसूती यशस्वीरीत्या पार पाडली.

कर्जत : प्रसुती म्हंटली की स्त्रीयांच्या मातृत्व जीवनातील आनंददायी प्रकिया असली तरी तेवढी किचकट सुद्धा असते. मात्र कर्जत शहरातील पवार हॉस्पिटल यांनी तीच प्रकिया सोमवार, दि २३ रोजी ५० वी वेदनाविरहित प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली.
प्रसुतीमध्ये स्रियांना होणार्या वेदना या अतिशय असह्य आणि पिडादायक असतात. या वेदनांच्या भितीमुळे प्रसूतीबद्दल स्त्रीयाच्या मनात कायम न्यूनगंड निर्माण होतो. यातून अनेक दाम्पत्य सिझेरियन करण्याचा मार्ग निवडतात. हीच प्रक्रिया कर्जत शहरातील पवार हॉस्पिटलचे संचालक स्त्री रोगतज्ञ डॉ दयानंद पवार आणि त्यांच्या भुलतज्ञ पत्नी डॉ श्वेता पवार यांनी वेदनाविरहित प्रसुती करण्याचा यशस्वी काम सोमवार, दि २३ रोजी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पार पाडले. पवार हॉस्पिटल कर्जत येथील ही पन्नासावी वेदनाविरहित प्रसिद्धी आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेदना विरहित प्रसूती पार पाडणारे पवार हॉस्पिटल कर्जत हे एकमेव रुग्णालय आहे. ऋतुजा स्वामी म्हस्के (रा बहिरोबावाडी. ता कर्जत) ही महिला आपल्या माहेरी पहिल्या प्रसुतीसाठी पवार हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मात्र प्रसुती वेदना असह्य झाल्याने रुग्ण व नातेवाईकांच्या विनंतीनंतर डॉ पवार दाम्पत्यानी वेदना विरहित प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. यावेळी डॉ श्वेता पवार यांनी भुल देत डॉ दयानंद पवार यांनी प्रसुती यशस्वीपणे पार पाडली. म्हस्के यांनी २ किलो ६०० ग्रॅमच्या सदृढ मुलाला जन्म दिला. सदर प्रसुतीमध्ये डॉ. राजेश तोरडमल, कीर्तीमाला तोरडमल, बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जगताप, परिचारिका सिमा ऊकिरडे, भारती भैलुमे, वर्षा शेलार, आया सविता अडसूळ यांनी विशेष सहकार्य केले. डॉ पवार दाम्पत्याच्या या कामगिरीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
– डॉ दयानंद पवार आणि श्वेता पवार संचालक – पवार हॉस्पिटल, कर्जत
2) पत्नीची पहिली प्रसुती व इन्फर्टिलिटी नगर व पुणे या ठिकाणी १ ते २ वर्ष उपचार घेऊन देखील मातृत्वाचे सुख मिळत नसताना पवार डॉक्टरांकडे केवळ दोन महिन्यांच्या उपचार घेऊन गर्भधारणा राहिला असल्याने चिंता होती मात्र डॉक्टरांनी सर्वोच प्रयत्न करून मुंबई पुणे येथील कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या अत्याधुनिक वेदना विरहित प्रसुती कर्जतला सुलभ पार पाडल्याने आई आणि बाबा होण्याचा मानवी जीवनातील सर्वोच्च आनंद मिळाल्याची प्रतिक्रिया ऋतुजा आणि स्वामी म्हस्के या दाम्पत्याने दिली.