कर्जत जामखेड लोकसभा मतदारसंघात ६५.८१% टक्के मतदान

कर्जत (प्रतिनिधी) : – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात तुरळक तक्रारी वगळता अत्यंत शांततेत मतदान पार पडले, असून एकूण सरासरी ६५.८१% टक्के मतदान संपन्न झाले असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. अनेक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या अडचणीमुळे काही ठिकाणी मतदान पूर्ण होण्यास वेळ लागला तर विविध मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ३५६ मतदान केंद्रावर एकूण ३ लाख ३६ हजार ९०३ मतदारांपैकी २ लाख २१ हजार ७२७ मतदारांनी आपला मतदानाचा हक बजावला. यामध्ये पुरुष मतदार १ लाख २२ हजार ७४२ तर महिला ९८ हजार ९८५ मतदारांचा समावेश आहे. ३५६ मतदान केंद्रावर सरासरी ६५.८१ %टके मतदान संपन्न झाले. सकाळी मतदान सुरू होण्या अगोदर प्रत्येक केंद्रावर प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदानाचे व मशीनचे प्रात्यक्षिक पहाटे ५ वाजले पासून घेण्यात आले. यानंतर सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त मतदान करून घेण्यासाठी राजकीय पक्षाचे व उमेदवारांचे प्रतिनिधीनी मतदारांची ने- आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होतीसकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती तर दुपारी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. उन्हाचा कडाका असल्यामुळे काही काळ मतदान केंद्रे ओस ही पडली होती. काही मतदान केंद्रावर मतदानाचा हक बजविण्यासाठी आलेल्या मतदारांनी
सेल्फी पॉईंटवर फोटो घेतते फोटो मोठ्या अभिमानाने सोशल मीडियातील शेअर केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आणि जामखेड तालुक्यात पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. कर्जत तालुक्यात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी कर्जतचे तहसीलदार गुरू बिराजदार व जामखेडचे तहसीलदार प्रकाश माळी यांचे सह महसूल व इतर विभागाच्या कर्मचाऱ्याच्या साथीने यशस्वी रित्या निवडणूक प्रक्रिया पार पाडली.