राशीन ईदगाह मैदान सुशोभीकरणासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल प्रा.आ.राम शिंदे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार व लवकरच लोकार्पण.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशिन शहरातील ईदगाह मैदान सुशोभीकरण कामासाठी जवळपास दहा लाखाचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आज चौंडी येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने माजी मंत्री आमदार प्रा. रामजी शिंदे साहेब यांचा सत्कार करताना गव्हरमेंट काॅन्ट्रक्टर सल्लाउद्दीन काझी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष सोयब काका काझी,मदीना मकतब चे सचिव तसेच पत्रकार जावेदभाई काझी,मरकज मस्जिद चे जिम्मेदार ट्रस्टी जमीरभाई काझी. इतर मुस्लिम बांधव व इतर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे मुस्लिम समाजासाठी पुढील येणाऱ्या काळात मुस्लिम समाजासाठी योग्य त्या ठिकाणी आणखी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांनी या प्रसंगी दिली.
तसेच लवकरच ईदगाह सुशोभीकरण लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात साजरा करू, तसेच आपण काम करत आहोत पण उद्घाटन मात्र विरोधक करीत आहेत असा खोचक टोला देखील यावेळी राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला.