ब्रेकिंग
राशीनच्या अराफत शेख चिमुकल्याने पूर्ण केला आयुष्यातील पहिला रोजा.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशिन( प्रतिनिधी)जावेद काझी :- राशीन येथील अराफत जाकीर शेख या ९ वर्षीय इयत्ता ३ री मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या या जिगरबाज
लहान बालकाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवार दिनांक २१/४/२३ रोजी अल्लाह च्या मर्जीनुसार पूर्ण केला अशा उन्हाळ्याच्या कठीण दिवसात तहान भूक विसरून १७ तासाचा काही न खाता पिता निरंकार रोजा करीत अल्लाह दिलेल्या नियमाचे पालन करीत या चिमुकल्या बालकांनी आपला पहिला रोजा पूर्ण केला.
अराफत हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून वडील जाकीर गफूर शेख कोंबडी पोल्ट्री व्यवसायात मास्टरमाइंड व्यवसायिक म्हणून राशीन व परिसरात ओळखले जातात.
एवढ्या कमी वयात रोजा पूर्ण केल्यामुळे राशीन व परिसरातील मुस्लिम बांधवाकडून अराफतचे कौतुक होत आहे.