ईदगाह मस्जिद जवळील विद्युत रोहित्र स्थलांतर करा राशीन मुस्लिम समाजाची निवेदन द्वारे मागणी.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .राशीन येथील ईदगाह मस्जिद परिसरात चिटकून असलेले विद्युत रोहित्र (डीपी) बाबत धार्मिक स्थळाची कुठल्याही प्रकारची अधिसूचना व कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीपणे अनेक वर्षापासून विद्युत रोहित्र बसविण्यात आले असून या विद्युत रोहीत्रावर मोठ्या प्रमाणात सहन न होणारा अतिरिक्त भार असल्यामुळे येथील विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असून
याचा परिणाम पाच वेळा मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांना सहन करावा लागत असून डीपी लगत असलेल्या नळाच्या पाण्याच्या प्रवाहात वजू करत असताना अनेक मुस्लिम बांधवांना करंट बसत असून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत वेळोवेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनअद्याप कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचललेली दिसत नाहीत तसेच अनेक दिवसातून तीन-चार वेळेस फटाके वाजल्यासारखा आवाज वारंवार डीपी मधून येत आहे.
याच कारणामुळे नमाज साठी येणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांची जीवित हानी होण्याची दाट शक्यता भासत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावधानता बाळगत ईदगाह मस्जिद शेजारी विद्युत रोहित्र काही अंतरावर पुढील बाजू स्थलांतर करावे अन्यथा जीवित हानी झाल्यास यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील याची दक्षता घ्यावी विद्युत रोहित्र चे स्थलांतरण न झाल्यास मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
याबाबतचे लेखी निवेदन महावितरण चे सहाय्यक अभियंता नितेश चव्हाण यांना मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी भाजपाअल्पसंख्यांक प्रदेश सचिव सोयब काझी. राजू भाई शेख, गफ्फार भाई शेख, मोहसीन अल्लाउद्दीन काझी, पत्रकार जावेद काझी, मोहसीन खैरूनकाझी, बशीर काझी, जुबेर शेख, उद्धव जानभरे,, रमेश झांबरे आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.