उल्का बाळासाहेब केदारे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत येथील सौ. सो. ना. सोनमाळी विद्यामंदिरचे मुख्याध्यापीका उल्का बाळासाहेब केदारे यांना राष्ट्रीय बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. अशी माहिती दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर यांनी दिली.
राष्ट्रीय बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार हा ‘दहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन 2023 क्रांतीदिन बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी शारदाबाई पवार सभागृह, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत होणार असून या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
‘दहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन 2023 मराठी विभागाच्या वतीने दादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
हे संमेलन सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होत आहे.