नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रं २ मध्ये एलईडी लाईटच्या कामांचे भूमिपूजन

कर्जत प्रतिनिधी: :- कर्जत शहरात गेल्या पंधरा दिवसापासून आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आलेल्या निधीमधून विविध विकास कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रत्येक प्रभाग निहाय सुरू असून त्यामध्ये आज प्रभाग क्रमांक दोन मधील खरात वस्ती या
ठिकाणी स्वीकृत नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या प्रयत्नातून तसेच महिला व बालकल्याण च्या उपसभापती लंकाताई खरात यांच्या मागणीवरून आलेल्या सात लाख रुपये निधीच्या स्ट्रीट लाईट कामाचे भूमिपूजन कार्यक्रम खरात वस्ती ते आयटीआय कॉलेज पर्यंत होणार आहे यावेळी या कार्यक्रमासाठी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत गटनेते संतोष मेहत्रे प्रथम शहराध्यक्ष प्रा विशाल मेहेत्रे युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल नगरसेवक सुनील शेलार, लालासाहेब शेळके त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मधील खरात वस्तीवरील सर्व नागरिक उपस्थित होते.