डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राशीन मध्ये ठीक ठिकाणी उत्साहात साजरी.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राशिन मध्ये ठीक ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथमता मुख्य बाजारपेठेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राशीन च्या लाेकाभिमुख सरपंच नीलम साळवे व कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजेंद्र भैय्या देशमुख, पै. शामभाऊ कानगुडे ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, राम कानगुडे , स्वप्निल मोढळे, दीपक थोरात अमोल जाधव, गणेश कदम, तात्यासाहेब माने, सुभाष जाधव रामकिसन साळवे भीमराव साळवे , संजय ढगे , रवींद्र दामोदरे, कमलेश साळवे, संतोष सरोदे, एकनाथ धोंडे , बापू धोंडे, अमोल शेटे , ईश्वर सोनवणे , मेजर पापू काझी भारत साळवे, इतर
ग्रामस्थ व भीमसैनिकांनी महामानवास त्रिवार विनम्र अभिवादन केले, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नील क्रांती चौक, इंदिरानगर, समाज मंदिर अशा अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नीलम साळवे यांनी केले. विशेष बाब म्हणजे नील क्रांती चौकात विजयस्तंभ कोरेगाव प्रतिकृती उभारण्यात आली होती महामानवाची उत्कृष्ट प्रतिमेची प्रतिकृतीने अनेकांचे लक्ष वेधले होते, यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ भिमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.