अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने दौंड धाराशिव रस्त्याच्या कामात मापात पाप करू नये ; विजयनाना मोढळे.

राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन मुख्य बाजारपेठेतून दौंड धाराशिव (उस्मानाबाद) सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू होणार असून तत्पुवी ड्रेनेज (गटार) काम सध्या सुरू असून रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस ७ मिटर मोजमाप करून मार्किंग करण्यात आली आहे परंतु काही ठिकाणी तोंड बघुन दांडशाही,हुकूमशाही,वशीलेबाजीचा वापर करून रस्त्याबाबत नियमावली दाखवत कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून मुख्य बाजारपेठेत काही ठिकाणी अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर दबावाखाली काम करताना दिसत आहे.
त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस मध्यभागापासून दुजाभाव न करता कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांनी नियमावलीतच काम करावे तसेच मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्याच्या बाजूला झाडे तोडून झाडे दोन दिवस झाले रस्त्यावर तसेच पडून आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना व रहिवाशांना निमुळती वाट काढून मार्ग काढावा लागत आहे. हे फार दुर्दैवी आहे.
रस्त्यावरील कापलेले झाड व फांद्या त्वरित उचलण्याचा बंदोबस्त करावा तसेच दौंड धाराशिव रस्त्याच्या व गटार बाबत सर्व बाबी लक्षात घेता अधिकाऱ्यांनी कोणाबाबतही दुजाभाव न करता नियमावलीप्रमाणे काटेकोरपणे काम करावे निष्कृष्ट दर्जाचे काम करू नये. असा कडवट इशारा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय नाना मोढळे यांनी दिला आहे.