Advertisement
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

कर्जत तालुका मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे महा रक्तदान शिबीराचे आयोजन

Samrudhakarjat
4 0 1 4 1 5

कर्जत प्रतिनिधी:-माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात. अत्यवस्थ रूग्ण, रक्तदानच जीवदान देणारे ठरते. रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजण्यासाठी कर्जत मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या

वतीने तालुकास्तरीय महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्जत तालुक्याच्या इतिहासातील विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १४ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री ५ यावेळेत मराठी मुलांची शाळा कर्जत, मेन रोड याठिकाणी सदर शिबीर होणार आहे अशी माहिती कर्जत तालुका मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष महेश तोरडमल व सदस्यनी दिली.

या शिबीरासाठी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे तसेच सर्व सामाजिक संघटना, कर्जत व्यापारी संघटना, डॉक्टर असोसिएशन कर्जत या सर्वांचे सहकार्य या रक्तदान शिबिरासाठी लाभणार आहे.

      अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने कर्जत तालुक्यासह प्रत्येक तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत २०२२ मध्ये महा रक्तदान शिबिर घेवून विक्रमी रक्त संकलन केले होते. यावर्षी देखील असाच विक्रमी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदान चळवळ ही काळाची गरज आहे. खाद्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान गरजू रुग्णांसाठी वरदान ठरते. अनेक आजारात रक्त घटकांचीही आवश्यकता असते. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी कृत्रिम रक्त निर्मिती शक्य झालेली नाही. अशावेळी माणसाने माणसासाठी केलेले रक्तदानच महत्वाचे असते. रक्तदानामुळे रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते हे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे कर्जत हे महा रक्तदान शिबीरत महाराष्ट्राच्या नकाशावर येईल यासाठी जास्तीत जास्त नगरकरांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कर्जत तालुका मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker