बांधकाम कामगार सेना योजने अंतर्गत जिल्हाउपाध्यक्ष अंबादास जाधव यांच्या प्रयत्नातून राशिन मधील शंभर कुटुंबांना मोफत भांडी वाटप.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. अहिल्यानगर येथे बुधवार दिनांक 8/ 10 /2025 रोजी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अहिल्यानगर येथील कार्यालयासमोर राशीन येथील बहुसंख्य महिला व पुरुष बांधकाम कामगार योजनेतील 100 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना तीस हजार रुपये किमतीचे गृह उपयोगी भांडे व इतर साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी वेळोवेळी सतत योजनेच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असलेले बांधकाम कामगार सेना उपजिल्हाप्रमुख श्री अंबादास जी जाधव व तसेच मा. ग्रामपंचायत सदस्या सौ. सारिका अमोल जाधव यांच्या प्रयत्नातून करत असलेले लोक उपयोगी असलेली योजनेची माहिती देऊन प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंत गरीब,गरजू नागरिकांपर्यंत कसे पोहोचेल

याचे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी कार्यरत असलेले कुटुंब म्हणजे जाधव कुटुंब व सतत जनतेच्या हितासाठी झगडत असलेले कुटुंब म्हणजे जाधव कुटुंब तरी जाधव यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे OSD श्री. मंगेशजी चिवटे साहेब ,शिवसेनेचे नेते संतोष जी रजपूत पुणे, प्रदेश अध्यक्ष मा. प्रीतमजी धारिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंबादासजी जाधव सामाजिक कार्याचा वसा घेऊन काम करत आहेत . केलेल्या उत्तुंग भरारीच्या सामाजिक कार्याबद्दल जाधव यांच्यावर वरिष्ठाकडून कौतुकाची सहकार्याची थाप पडत आहे. वरिष्ठ मंडळींनी साथ दिल्यामुळे मी सर्वसामान्यांचे काम करू शकलो त्याबद्दल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले . यावेळी शंभर गरीब ,गरजू ,अनाथ, परितक्ता, लाभार्थ्यांना योजनेचा लाभ भांडे वाटप करून देण्यात आला.




